पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:16+5:302021-01-08T06:10:16+5:30

पशुवैद्यकीय सेवेकरिता वाशिम जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ व श्रेणी २, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व ...

Times of veterinary clinics have changed! | पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या!

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या!

Next

पशुवैद्यकीय सेवेकरिता वाशिम जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ व श्रेणी २, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यरत आहेत. या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४.३० पर्यंत सुरू राहणार आहेत, तसेच शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असणार आहे. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले.

००००

‘बर्ड फ्लू’मुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट

राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशात बर्ड फ्लूने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विदर्भात सध्या बर्ड फ्लूचे संकट आले नाही. आगामी ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. परराज्यातील संशयित क्षेत्रावरून जिल्ह्यात पक्ष्यांची वाहतूक होत नसल्याने तूर्तास भीतीचे कोणतेही कारण नाही. आगामी काळात संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक जिल्ह्यात होणार नाही, या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

Web Title: Times of veterinary clinics have changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.