शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘टिनशेड’ची सुविधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:49 PM2018-08-31T13:49:24+5:302018-08-31T13:49:48+5:30
शेंदुरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या नातेवाईकांची स्वयंपाक व निवासाची सोय व्हावी म्हणून आरोग्य केंद्रात १५ बाय २० फुट आकराचे टिनाचे शेड स्वखर्चातून बांधून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) - आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी स्व.नामदेवराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेचे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब काळे यांनी शेंदुरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या नातेवाईकांची स्वयंपाक व निवासाची सोय व्हावी म्हणून आरोग्य केंद्रात १५ बाय २० फुट आकराचे टिनाचे शेड स्वखर्चातून बांधून दिले.
शेंदुरजना येथील प्रा. भाऊसाहेब काळे यांच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आरोग्य केंद्रात टिनशेड बांधून देण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा.भाऊसाहेब काळे यांचा आरोग्य केंद्राच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडारे यांनी सत्कार केला. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सचिन रोकडे पाटील उपस्थित होते. यावेळी एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ.गायत्री भाऊसाहेब काळे हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडारे, सुरेश केदार, गजानन जाधव, दाभाळकर आदींची उपस्थिती होती.