दिव्यांगांसाठी तिरडी व अंत्यविधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:54+5:302021-07-23T04:24:54+5:30
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे वतीने १ डिसेंबर २०२० रोजी दिलेले पत्र व ३ डिसेंबर २०२० रोजी झोपलेल्या प्रशासनाला जागे ...
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे वतीने १ डिसेंबर २०२० रोजी दिलेले पत्र व ३ डिसेंबर २०२० रोजी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याकरिता डफडे वाजवत धरणे आंदोलन केले होते. परंतु मागील वर्षी आंदोलन करुन सुध्दा अद्यापपर्यंत दिव्यांगांना न्याय मिळालेला नाही. तरी ३ डिसेंबर २०२० च्या पत्रामधील मुद्दे व त्याचप्रमाणे १४ वा वित्त आयोग व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या सर्वांना ५ टक्के निधी दिव्यांगांकरिता खर्च करण्याची मुभा देण्यात यावी. संजय गांधी वेतन बँकेत जमा झाल्यावर दोन दोन महिने वाटप होत नाही, ते त्वरित देण्यात यावे. समाजकल्याणमार्फत बीज भांडवल योजना राबविण्यात येते, मात्र बँका कर्ज प्रकरण मंजूर करीत नसल्यामुळे कुठल्याही दिव्यांगाला बीज भांडवल योजनेचा लाभ मिळत नाही. संजय गांधी पेन्शन योजना नवीन लाभार्थ्यांकरिता दर महिन्याला बैठक घेऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. दिव्यांग शेतकऱ्यांना कृषी विभागात प्राधान्य देण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांगांना तत्काळ घरकूल योजनेमध्ये समाविष्ट करुन योजनेचा लाभ देण्यात यावा. बँकेमध्ये दिव्यांगांना न थांबवता प्राधान्य देण्यात यावे. दिव्यांग व्यक्ती हक्क २०१६ ची अंमलबजावणी व महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.