मग्रारोहयोमधील मजुरांची मजुरी थकित
By admin | Published: January 20, 2015 12:40 AM2015-01-20T00:40:21+5:302015-01-20T00:40:21+5:30
वाशिम जिल्ह्यातील मजुरांवर उपासमार: कारवाईची मागणी.
वाशिम : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतावर कामे नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काम करुन दोन महिने झाले तरी मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमार आली आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मजुराची उपासमार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात पाच- पाच कामे सुरु करण्याचे आदेश दिलेत; परंतु दुसरीकडे रोहयोची कामे करुन महिना दोन महिना काम करुन कामाचे दाम मजुरांना मिळाले नाही. १५ दिवसात मजुरांना कामाचा मोबदला द्या, अन्यथा दोषीवर कार्यवाही करा, असा रोहयोचा नियम आहे. वाशिम पं.स. मध्ये १00 च्या वर मस्टर/हजेरीपत्रक पेंडिंग आहेत. ए.पी.ओ. खिल्लारे म्हणतात. बिल पास केले नाही आणि गट विकास अधिकार्यांनी सहय़ा केल्या नाहीत तर मी पैसे कसे पाठवू. गटविकास अधिकारी आर.के. तांबे म्हणतात, मजुरांच्या पैशाला विलंब लावू नका; मात्र कोणीही पुढाकार घेत नसल्याने यामध्ये मात्र मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी वाशिम पं.स.च्या हलगर्जीपणाकडे गांभीर्याने लक्ष घालून मजुरी तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत व दुष्काळग्रस्त मजुराला उपासमारीची वेळ आणणार्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. मजुरांचे मजुरीचे पेंडिंग मस्टर लवकर पास करुन देण्याचे आदेश आपण सले आ. पाटील यांना दिले. तसेच कुठल्याही मजुरांच्या मस्टरला विलंब लावू नये, असे आदेशही एपीओ खिलारे यांना दिले आहेत. लवकरच मजुरांना त्यांची मजुरी मिळेल, असे गटविकास अधिकारी आर.के. तांबे यांनी सांगीतले.