२७५ ग्रा.पं.मध्ये आजपासून ‘गुड मॉर्निंग!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:18 AM2017-08-09T02:18:17+5:302017-08-09T02:20:08+5:30

वाशिम : २७५ ग्राम पंचायत क्षेत्रात ९ ऑगस्टपासून रोज पहाटे ‘गुड मॉनिर्ंग’ पथक कार्यान्वित केले जाणार असून ‘खुले में शौच से आजादी’ या अभियानाचे उद्घाटनही केले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी मंगळवारी दिली. 

From today in 275 gp 'Good morning!' | २७५ ग्रा.पं.मध्ये आजपासून ‘गुड मॉर्निंग!’

२७५ ग्रा.पं.मध्ये आजपासून ‘गुड मॉर्निंग!’

Next
ठळक मुद्देजि.प.चा निर्णय इस्कापे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : २७५ ग्राम पंचायत क्षेत्रात ९ ऑगस्टपासून रोज पहाटे ‘गुड मॉनिर्ंग’ पथक कार्यान्वित केले जाणार असून ‘खुले में शौच से आजादी’ या अभियानाचे उद्घाटनही केले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी मंगळवारी दिली. 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी गुड मॉनिर्ंग करण्यात आले होते. आता या मोहिमेदरम्यान उघड्यावर शौचास जाणार्‍यांना १२00 रुपयांचा दंड केला जाणार आहे. दंड न भरणार्‍यांना थेट पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याची माहिती इस्कापे यांनी दिली.

Web Title: From today in 275 gp 'Good morning!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.