पथनाट्य अर्जासाठी आज अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:37 AM2021-01-21T04:37:01+5:302021-01-21T04:37:01+5:30
वाशिम : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत ...
वाशिम : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनुभवी संस्थांना २१ जानेवारीपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत.
०००००००
सभापतींनी घेतला शाळांचा आढावा
वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असून, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी २० जानेवारीला शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
०००००
१२६ जणांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : वाहन चालविताना मास्कचा वापर न करणे, तिबल सीट, चालक परवाना नसणे, आदी कारणांवरून शहर वाहतूक शाखेने गत दोन दिवसांत १२६ जणांवर दंडात्मक कारवाइ केली.
०००००००
पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यास संपर्क साधावा
वाशिम : राज्यात काही ठिकाणी ‘बर्ड फ्लू’चा धोका असून, जिल्ह्यात अद्याप हा धोका नाही. तथापि, कुठेही मृतावस्थेत पक्षी आढळून आल्यास नजीकच्या पशुचिकित्सा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद वानखडे यांनी बुधवारी केले.