२५ टक्के मोफत प्रवेश अर्जासाठी आज शेवटचा दिवस
By Admin | Published: July 10, 2017 02:02 AM2017-07-10T02:02:46+5:302017-07-10T02:02:46+5:30
२५ टक्के कोट्यातील जागा रिक्त असल्याने या जागेसाठी संबंधित शाळेत आॅनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्ज पात्र ठरल्यास प्रवेश मिळणार आहे. ११ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: पूर्व वैमनस्यातून दोन ट्रक चालकांनी तिसऱ्या ट्रक चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता च्या दरम्यान वडप टोल नाक्याजवळ घडली. या ट्रकच्या थरारात तिसरा ट्रक उलटून त्यामधील चालक जखमी झाला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेश सुलतानपूर जिल्ह्यातील अलिंगज येथील रहिवासी जखमी चालक जुम्मन युनूस (२२) हा क्र.एम.एच.०४ एफडी ८७९२ क्रमांकाचा ट्रक घेऊन वाशी मुंबईवरुन नागपूरकडे जात असता विरुद्ध दिशेने आरोपी ललक मिराज गौसी रा.सुलतानपूर जि.अलिगंज उत्तर प्रदेश एम.एल ०४ -७४१७ क्रमांकाचा ट्रक घेऊन विरुद्ध दिशेने येत होता. मालेगावनजीक वडप बायपासवर हे दोन ट्रक आमोरासमोर आले असता आरोपी ट्रॅक चालक मिराज गौसी यांनी पूर्ववैमनस्यातून बदला घेण्याच्या उद्देशाने ट्रॅक वडप टोलनाक्यावरुन पलटून एम.एच.०४ एफडी ८७९२ क्रमांकाच्या ट्रॅकच्या मागे लागला. तसेच मागून क्र.एम.एच.०४ जी.आर.०५६२ या क्रमांकाचा ट्रक घेऊन येत असलेला आरोपीचा मित्र एजाज मलीक रा.सिध्दार्थ नगर यू.पी. याला आरोपीने फोन करुन जुम्मन युनूस समोरुन येत आहे. मी त्याचा पाठलाग करीत आहे. तु त्याला समोरुन धडक दे मी मागून जोरदार धडक देतो. असे म्हणत जुम्मनच्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. वडप टोलनाक्यापासून वडप बायपासपर्यंतच्या मार्गावर ट्रॅकचा हा थरार सुरु होता. त्यावेळी डोंगरकिन्ही येथून मालेगावकडे येणारे प्रदीप गवई यांना सदर प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फोन करुन सदर माहिती दिली असता कर्तव्यावर हजर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गवई व शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान या दोन ट्रॅकमधील एका ट्रॅक चालकाने जीव वाचविण्याच्या भीतीने आपला ट्रॅक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा ट्रक उलटला. यानंतर आरोपी मिराज गौसी हा मेहकरकडे आपला ट्रक घेऊन निघून गेला. मात्र, दुसरा आरोपी एजाज मलिक यास पोलिसांनी त्यांच्या ट्रॅकसह ताब्यात घेऊन डोणगाव पोलिसांना सदर ट्रकबाबत माहिती दिलीे.
डोणगाव पोलिसांनी आरोपी मिराज गौसीसह ट्रॅक ताब्यात घेऊन मालेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी ए.पी.आय. गवई व शिंदे पो.काँ. संजय पवार व श्रीराम मिश्रा चालक भालेराव यांनी जखमी चालक जुम्मन युनूस यास ग्रामीण रुग्णयालयात उपचारासाठी नेले होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२३, ५०४, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.