आज पोलिओ लसीकरण मोहीम

By Admin | Published: April 2, 2017 02:21 AM2017-04-02T02:21:10+5:302017-04-02T02:21:10+5:30

२ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील ९४३ बुथवर पोलिओचा डोस दिला जाणार आहे.

Today Polio Vaccination Campaign | आज पोलिओ लसीकरण मोहीम

आज पोलिओ लसीकरण मोहीम

googlenewsNext

वाशिम, दि. १- 0 ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख २५ हजार ५८५ बालकांना २ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ९४३ बुथवर पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
0 ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार १२३ तर नागरी भागात ३४ हजार ४६२ अशी एकूण १ लाख २५ हजार ५८५ इतकी आहे. ग्रामीण भागात ८२१ आणि नागरी भागात १२२ असे एकूण ९४३ पल्स पोलिओ लसीकरण बुथ स्थापन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. 0 ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पटेल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांनी केले आहे.

Web Title: Today Polio Vaccination Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.