आजपासून वाशीममध्ये ‘ग्रंथोत्सव’; ग्रथदिंडीने होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:51 AM2017-11-29T10:51:25+5:302017-11-29T10:51:39+5:30
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने येथील एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये २९ व ३0 नोव्हेंबर रोजी ‘ग्रंथोत्सव २0१७’ चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने येथील एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये २९ व ३0 नोव्हेंबर रोजी ‘ग्रंथोत्सव २0१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, नागरिकांनी ग्रंथोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवानिमित्त २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार अँड. विजय जाधव, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. व्य. रा. बावने, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सव उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी ११.३0 वाजता महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.