साथरोगाने वाशिम जिल्हा फणफणला; रुग्णालये हाउसफुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:07 AM2018-01-25T01:07:11+5:302018-01-25T01:07:24+5:30

वाशिम :  वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, हिवताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आदी साथरोग बळावले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी अज्ञात त्वचारोगाने नागरिक भयभीत आहेत. उपचारार्थ सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत रुग्णांनी धाव घेतल्याने रुग्णालये हाउसफुल झाल्याचे दिसून येते.

Together with Washim District Phanfan; Hospitals full house! | साथरोगाने वाशिम जिल्हा फणफणला; रुग्णालये हाउसफुल!

साथरोगाने वाशिम जिल्हा फणफणला; रुग्णालये हाउसफुल!

Next
ठळक मुद्देअज्ञात त्वचारोगाची भीती कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, हिवताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आदी साथरोग बळावले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी अज्ञात त्वचारोगाने नागरिक भयभीत आहेत. उपचारार्थ सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत रुग्णांनी धाव घेतल्याने रुग्णालये हाउसफुल झाल्याचे दिसून येते.
गत १0 ते १५ दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे.  मध्यंतरी थंडी गायब झाली होती. आता रात्रीच्या सुमारास थंडी वाढल्याने आणि दिवसाचे वातावरण बदलल्याने साथरोग बळावत असल्याचे दिसून येते. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप,  हिवताप, डोकेदुखी, घशाला खवखव, विषमज्वर आदी आजार नागरिकांना जडत असल्याचे दिसून येते. या विषाणूजन्य तापासोबत लहान मुलांना सर्दी, खोकला व डोकेदुखीने त्रस्त करून सोडले आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज २५0 ते ३00 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत होते. आता हा आकडा ५00 ते ५५0 वर पोहोचला असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रातही साथरोगाने त्रस्त असलेले रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. 
खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी होत आहे. खासगी दवाखान्यात सरासरी ३0 टक्क्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी सांगितले. लहान बालकांनादेखील सर्दी, ताप व खोकला या आजाराने ग्रासले आहे. वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा बालरोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

वातावरणातील बदलामुळे साथरोग उद्भवत आहेत. उमरा कापसे येथील त्वचा आजारप्रकरणी आरोग्य विभागाचे पथक पाठविण्यात आले होते. या आजाराचे निदान झाले असून, नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. साथरोगप्रकरणी रुग्णांनी सरकारी दवाखान्यांतील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.
- डॉ. दीपक सेलोकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

Web Title: Together with Washim District Phanfan; Hospitals full house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.