वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:24 PM2018-03-23T17:24:30+5:302018-03-23T17:24:30+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असून, ३१ मार्चपूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाने सदर उद्दिष्ट गाठले आहे. आता केवळ जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे.
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असून, ३१ मार्चपूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाने सदर उद्दिष्ट गाठले आहे. आता केवळ जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे.
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाने गृहभेटीद्वारे गावोगावी जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, पानुताई जाधव, यमुना जाधव यांच्यासह तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता मिशन विभाग) महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषद , पंचायत समितीचे पदाधिकाºयांनी गृहभेटीत सहभाग नोंदवून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन जनतेला केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्विकारल्यानंतर दीपककुमार मीणा यांनीदेखील स्वच्छता विभागाचा आढावा घेऊन उर्वरीत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या होत्या तसेच शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. ३१ मार्चपूर्वी जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल ठेवणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने त्यापूर्वीच शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केले. जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथकाने जनजागृतीच्या मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडली. सर्वांच्या सहकार्यातून १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठले आहे. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. आता जिल्हा हगणदरीमुक्त घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. हगणदरीमुक्त जिल्हा घोषित झाल्यानंतर नागरिकांना शौचालयाचा नियमित वापर करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनातर्र्फे भर दिला जाणार आहे. उघड्यावर शौचास कुणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.