जानोरी येथे टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:46+5:302021-06-18T04:28:46+5:30
जानोरी येथील उपक्रमशील शेतकरी शिवा बोदडे हे दरवर्षीच इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शेतात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मोठे उत्पादन आपल्या ...
जानोरी येथील उपक्रमशील शेतकरी शिवा बोदडे हे दरवर्षीच इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शेतात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मोठे उत्पादन आपल्या शेतीत घेत असतात. यावर्षीसुद्धा बोदडे यांनी आपल्या शेतात अगोदर सऱ्या पाडून त्यावर दोन ओळीतील अंतर २५ इंच दोन रोपातील अंतर १३ इंच ठेवून दोन एकरात फक्त १८ किलो बियाणे वापर केला . म्हणजेच एकूण एकरी ९ किलो बियाण्यांचा वापर केला.
तसेच यामध्ये आंतरपीक म्हणून तूरसुद्धा लावली. तुरीचे एकरी ३ किलो बियाणे म्हणजे दोन एकरला ६ किलो बियाणे लागले. टोकन पद्धतीने लागवड करताना पूर्णपणे कुजलेले शेणखतसुद्धा त्यांनी सोयाबीनला दिले.
शेतकरी बोदडे यांनी केलेल्या यशस्वी उपक्रमामुळे शेतकरी वर्गाला कमी बियाणे लागून आर्थिक खर्चसुद्धा कमी होऊन उत्पादनात वाढ होणार असल्याने अगदी नवीन प्रयोग यावर्षी आपल्याला जानोरी गावात पाहावयास मिळणार असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे.