वाशिममध्ये टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:00 PM2018-09-05T13:00:26+5:302018-09-05T13:01:14+5:30
वाशिम : शेतांमध्ये काबाडकष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला सद्या योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतांमध्ये काबाडकष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला सद्या योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हर्रासीमध्ये टोमॅटोला मिळत असलेल्या ३ ते ४ रुपये प्रतिकिलोच्या दरामुळे उत्पादनखर्चही वसूल होणे कठीण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. बाजारात अचानक आवक वाढल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकºयांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सध्या टोमॅटोला अत्यंत कमी प्रमाणात बाजारभाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात दहा रुपये किलो असणारा टोमॅटो आता चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, समाधानकारक बाजारभाव नसल्याने तसेच वाहतुक खर्चही निघत नसल्याने काही शेतकºयांनी शेतांमधील झाडांना लदबदलेले टोमॅटो देखील न काढता तसेच ठेवले आहेत.