पर्यटन क्षेत्र विकासाला मिळणार चालना !

By admin | Published: July 21, 2016 05:31 PM2016-07-21T17:31:42+5:302016-07-21T17:31:42+5:30

गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.

Tourism sector will get development! | पर्यटन क्षेत्र विकासाला मिळणार चालना !

पर्यटन क्षेत्र विकासाला मिळणार चालना !

Next


वाशिम - गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.
पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नियोजन व निधी पुरविला जात होता. ग्रामीण भागातील पर्यटनक्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा नियोजन विकास समितीने करावे की जिल्हा परिषदेमार्फत केले जावे, या वादात ह्यपर्यटनह्ण क्षेत्रांचा विकास रखडला होता. पर्यटन क्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय झाल्याने गत चार वर्षांपासून रखडलेल्या कामांचे नियोजन आता करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील पर्यटन क्षेत्रांचा समान प्रमाणात विकास करण्यासाठी सर्व सदस्यांकडून कामांची मागणी नोंदविण्यात आली. सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या चार वर्षातील पर्यटन क्षेत्र विकासाचे नियोजन केल्यानंतर मंजूरीसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चार वर्षातील १६८ पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी सात कोटी २३ लाख २८ हजार रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी पाच कोटी ७३ लाख ५५  हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे पर्यटन क्षेत्रांचा विकास होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.

Web Title: Tourism sector will get development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.