सौरऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:59+5:302021-09-18T04:44:59+5:30

................ भुरट्या चोऱ्यांवर मिळाले नियंत्रण वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

Towards completion of solar power project | सौरऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे

सौरऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे

Next

................

भुरट्या चोऱ्यांवर मिळाले नियंत्रण

वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. यासह १६ सप्टेंबरपासून ११२ हा नवा हेल्पलाईन नंबर सेवेत कार्यान्वित झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

.................

नियमांचे उल्लंघन, पोलिसांची कारवाई

वाशिम : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने ट्रिपल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कारवायांमध्ये सातत्य राखले जात असून त्याचा अपेक्षित फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

............

रस्तादुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, कच्चा स्वरूपातील या रस्त्याला खड्डे पडले आहेत. रस्तादुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

.............

एटीडीएम मशीन पडलीत धूळ खात

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती, आदी ठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, त्यांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तत्काळ मिळावा, यासाठी एटीडीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली; मात्र किरकोळ दुरुस्तीअभावी ह्या मशीन धूळ खात आहेत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

.............

एस.टी. बसमध्ये नियमांचे उल्लंघन

वाशिम : महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाच्या बस सध्या प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. ना सोशल डिस्टन्सिंग, ना कुणाच्या तोंडाला मास्क, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोरोनाचा धोका बळावू शकतो. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यासंबंधी चालक, वाहकांना आदेश द्यावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.

...................

मनेरगाची कामे अद्याप ठप्प

वाशिम : रिसोड तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून त्याचा थेट परिणाम मनरेगाच्या कामांवर झाला असून, ही कामे गत काही महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. यामुळे गोरगरीब कुटुंबातील मजुरांच्याही हाताला काम मिळेनासे झाले आहे.

............

शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक

वाशिम : शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभरातील ३६५ दिवस जलाभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवारी शहरातील काही युवकांनी हा उपक्रम राबविला. शुद्ध जल आणून शिवरायांच्या पुतळ्यास यावेळी जलाभिषेक करण्यात आला.

................

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

वाशिम : तालुक्यातील अनसिंग परिसरातील बहुतांश गावांमध्ये कधीकाळी शेकडो हेक्टर गायरान वनजमीन राखून ठेवण्यात आली होती. त्यावर गुरे चरत असत. पशुपालकांचीही यामुळे सोय झाली होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले असून पशुपालकांसमोर जनावरे चराईसाठी कुठे सोडावीत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

...............

एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त

वाशिम : शहरील पाटणी चाैक, रिसोड नाका परिसरात विविध बँकांचे एटीएम लागलेले आहेत. त्यांतील काही एटीएम मशीन अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारीदेखील असाच अनुभव अनेक नागरिकांना आला. बँकिंग प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Towards completion of solar power project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.