विधवा महिलेस पाजले विषारी कीटकनाशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:30+5:302021-04-01T04:43:30+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंगडोह........................ येथील विधवा महिला नबीबाई चव्हाण हिला घरकूल मंजूर झाले होते; मात्र त्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ...

Toxic pesticides inflicted on widows | विधवा महिलेस पाजले विषारी कीटकनाशक

विधवा महिलेस पाजले विषारी कीटकनाशक

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंगडोह........................ येथील विधवा महिला नबीबाई चव्हाण हिला घरकूल मंजूर झाले होते; मात्र त्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे नातेवाईक भीमराव दिपला चव्हाण यांच्याकडे जाऊन तिने जागा देण्याची मागणी केली. यावेळी येथून निघून जा असे म्हणत नबीबाईला शिवीगाळ करण्यात आली. मंदाबाई चव्हाण हिने तिला धरले व भीमराव चव्हाणने त्याच्या हातात असलेली कीटकनाशक द्रव्याने भरलेल्या बाटलीतील औषध नबीबाईला जबरीने पाजले. यावेळी रामकृष्ण दिपला चव्हाण व राजू दिपला चव्हाण यांनी पाय धरून ठेवले, अशी फिर्याद नबीबाईने उपचारादरम्यान दिली. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी भीमराव दिपला चव्हाण (६०), रामकृष्ण दिपला चव्हाण (३६), राजू दिपला चव्हाण (५२), मंदा चव्हाण आदींवर कलम ३२८, ३०७, ५०४, ३४ भादंविअन्वये गुन्हे दाखल केले. ३१ मार्च रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Toxic pesticides inflicted on widows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.