जुन्या वाहनांच्या ‘ब्रेक टेस्ट’साठी वाशिम येथे तयार झाला ‘ट्रॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:46 PM2017-12-22T13:46:45+5:302017-12-22T13:49:20+5:30
वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे.
शिखरचंद बागरेचा
वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून गुरुवारी प्राप्त झाली.
राज्यातील २६ जिल्ह्यात जुन्या वाहनांची स्थिती तपासून ती चालविण्यासाठी योग्य आहे की नाही, ते तपासण्यासाठी आवश्यक असलेली ब्रेक टेस्ट ट्रॅकच उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांची तपासणी करून नुतनीकरणासाठी लगतच्या जिल्ह्यात जावे लागत होते. असा प्रकार १९ वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या वाशिम जिल्ह्यातही सुरू होता. दरम्यान, या प्रकारामुळे वाहनधारकांची होत असलेला त्रास आणि परिवहन विभागाच्या वाढलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ब्रेक ट्रॅक नसलेल्या २६ जिल्ह्यातील समस्या निकाली काढण्यासाठी परिवहन विभागाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद केली. त्यानुसार वाशिम जिल्ह्याच्या मुख्यालयी वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्र्डे येथे ही ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यात आली आहे. ही ट्रॅक २५० मीटर लांब असून, येत्या १५ जानेवारीपर्यंत हा ट्रॅक वाहनाच्या तपासणीसाठी सज्ज होणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी प्राप्त झाली.
वाहनांच्या तपासणीची होणार शुटिंग
जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट पूर्वी साध्या पद्धतीने अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात येत होत्या. यामध्ये बरेचदा वाहनांची तपासणी न करताच नुतनीकरण करण्यात येत असल्याचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होत्या. यामुळे चालविण्यासाठी योग्य नसलेली वाहने रस्त्यावर धावून अपघातास कारणीभूत ठरत होती. या पृष्ठभूमीवर शासनाने आता जुन्या वाहनांची तपासणी अर्थात ब्रेक टेस्ट कॅमेरा शुटिंगमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी संबंधित सर्वच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात व्हिडिओ शुटिंग कॅमेरासह इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रक्रि येत वाहनांचे वायपर योग्य आहेत की नाही, वाहनाचे लाईट किती प्रभावी आहे. वाहनाचे स्टिअरिंंग बरोबर आहे की नाही, हे दिसणार आहे. या पद्धतीने तपासणी केलेल्या वाहनांच्याच परवान्यांचेच नुतनीकरण यापुढे केले जाणार आहे.