माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढविला ; प्राणघातक हल्ल्याचा उदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:35 PM2018-05-28T16:35:31+5:302018-05-28T16:35:31+5:30

कारंजा लाड :  कारंजा येथील माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनाला गायवळ शेत शिवारात ट्रॅक्टरने धडक मारून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.  

tractor hit on vehicle of former city mayor of karanja | माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढविला ; प्राणघातक हल्ल्याचा उदेश

माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढविला ; प्राणघातक हल्ल्याचा उदेश

Next
ठळक मुद्दे शशिकांत चवरे हे गायवळ शेतशिवारातील आपल्या शेतात जात असताना त्यांच्या गाडीला प्राणघातक हल्ला करण्याच्या उदेशाने ट्रॅक्टर ने धडक मारली. त्या धडकेत चवरे यांच्या गाडीचे फार मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने गाडीतील चवरे कुटुंब बचावले.रामराव शंकर मार्गे यांच्या विरूध्द पोलिसांनी कलम ३४१, ४२७, ५०४, ३०७  भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

कारंजा लाड :  कारंजा येथील माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनाला गायवळ शेत शिवारात ट्रॅक्टरने धडक मारून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.  

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शशिकांत चवरे हे गायवळ शेतशिवारातील आपल्या शेतात जात असताना त्यांच्या गाडीला प्राणघातक हल्ला करण्याच्या उदेशाने ट्रॅक्टर ने धडक मारली. त्या धडकेत चवरे यांच्या गाडीचे फार मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने गाडीतील चवरे कुटुंब बचावले. शशिकांत चवरे यांच्या गायवळ शेतशिवारात असलेल्या शेतात ते आपल्या पत्नीसह दररोज सकाळी व संध्याकाळी जातात. त्यांचा रामराव शंकर मार्गे यांचेसोबत शेतीबाबत वाद सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशातच २७ मे रोजी एम .एच .२७  ए. ७७१६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर चवरे यांच्या एम .एच.३७ जी. ५२३२ क्रमांकाच्या कारवर येउुन धडकला. यावेळी चवरे कुटुंब कारमध्येच बसले होते. या धडकेने कारचे नुकसान झाले तर चवरे जखमी झाले. शशिकांत चवरे यांनी वरील आशयाची फिर्याद २७ मे रोजी कारंजा गा्रमीण पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. दाखल फियार्दीवरून आरोपी रामराव शंकर मार्गे यांच्या विरूध्द पोलिसांनी कलम ३४१, ४२७, ५०४, ३०७  भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमर चोरे करीत आहे.

Web Title: tractor hit on vehicle of former city mayor of karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.