डिझेल भाववाढीने ट्रॅक्टरमालक, शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:52+5:302021-05-28T04:29:52+5:30
वाढत्या डिझेल भावाचा परिणाम ट्रॅक्टरमालकासह शेतकऱ्यांवरही होत आहे. ६५ रुपये १९ पैसे दर असताना ट्रॅक्टरने शेती नांगरणीचे दर ...
वाढत्या डिझेल भावाचा परिणाम ट्रॅक्टरमालकासह शेतकऱ्यांवरही होत आहे. ६५ रुपये १९ पैसे दर असताना ट्रॅक्टरने शेती नांगरणीचे दर साडेतीनशे रुपये प्रतितास असे होते. आता डिझेलच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे साडेतीनशे रुपये एकर नांगरणी व चारशे रुपये एकर पेरणी हे ट्रॅक्टरमालकाला परवडेनासे झाले आहे. सहाजिकच नांगरणी, पेरणीचे दर वाढविणे क्रमप्राप्त झाले आहे. एकंदरीत डिझेलच्या भावामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे ट्रॅक्टर मालकासह शेतकऱ्यांनाही अडचणीचे ठरत आहे.
०००
कोट
एका तासाला किमान साडेतीन लिटर डिझेल व चाळीस रुपये तासाप्रमाणे चालकाची मजुरी असा साडेतीनशे रुपये खर्च येतो. त्यामुळे नांगरणी दरांमध्ये भाव वाढ केल्याशिवाय पर्याय नाही.
बबलू देशमुख
ट्रॅक्टरमालक, शिरपूर जैन.
अगोदरच नापिकी, त्यातच डिझेल भाववाढीने शेती मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीच्या दरात सरकारने डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे.
अरुण गाभणे, शेतकरी, शिरपूर जैन.
०००