व्यापाऱ्यांनीही नियमाचे पालन करणे गरजेचे- जुगलकिशोर कोठारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:22 PM2020-05-02T17:22:06+5:302020-05-02T17:22:32+5:30
व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशभरासह वाशिम जिल्ह्यातही संचारबंदी आणि लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता इतर व्यापार पूर्णत: ठप्प झाला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा ह्यग्रीन झोनह्णमध्ये असल्याने ४ मे पासून व्यापार सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. तथापि, व्यापाऱ्यांची भुमिका काय असावी, याबाबत व्यापारी मंडळाचे वाशिम जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांच्याशी साधलेला हा संवाद...
लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील व्यापाºयांचे किती नुकसान झाले?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि ह्यलॉकडाऊनह्णमुळे जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता जिल्ह्यातील इतर साहित्य विक्रीची सर्वच दुकाने गत ३८ दिवसांपासून कडेकोट बंद आहेत. यामुळे ६०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात ओढवलेल्या या आरिष्टामुळे मुख्यत: कपडा आणि सराफा व्यवसायाला जबर फटका बसला आहे. ४ मे पासून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येईल. व्यापाºयांनी धीर धरावा.
सर्व दुकाने उघडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहणार का?
नजिकच्या हिंगोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत वाशिम जिल्हा सद्यातरी निरंक आहे. ही जिल्हावासीयांसाठी भुषणावह बाब असून हे चित्र असेच कायम राहण्यासाठी ४ मे पासून सर्व दुकाने उघडल्यानंतर विशेषत: व्यापाºयांनी व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास निश्चितपणे परिस्थिती नियंत्रणात राहील, असे आपणास वाटते.
काय करावे लागणार?
कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी ह्यफिजीकल डिस्टन्सिंगह्ण, मास्कचा नियमित वापर, रोखीऐवजी आॅनलाईन व्यवहार आदी बाबींकडे व्यापाºयांनी तद्वतच ग्राहकांनी लक्ष पुरवायला हवे.
व्यापाºयांकडून नियमांचे पालन केले जाईल का?
वाशिम जिल्ह्यातील सर्वच व्यापारी पुर्वीपासूनच नियमांचे पालन करणारे आहेत. गत ३८ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्ण कालावधीत सर्वांनीच लाखो रुपयांचे नुकसान सहन करून आपापली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापपर्यंत टळला नसल्याने यापुढेही प्रशासन घालून देईल, त्या नियमांचे पालन जिल्ह्यातील व्यापारी निश्चितपणे करतील. दुकानांवर खरेदीसाठी येणाºया नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.