वाशिम जिल्ह्यात ११ वर्षापासून जपली जातेय ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:23 IST2017-12-04T23:18:09+5:302017-12-04T23:23:35+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत ११ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे. यावर्षीदेखील ६ डिसेंबरला जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला जाणार आहे.

वाशिम जिल्ह्यात ११ वर्षापासून जपली जातेय ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत ११ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे. यावर्षीदेखील ६ डिसेंबरला जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला जाणार आहे.
महापरिनिर्वाण दिनी वाशिम येथे साधारणत: २००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ व मोफत शिकवणी वर्गाचा संकल्प आंबेडकरी अनुयायांनी केला होता. ६ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपºयातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येतात. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते. २००६ पासून सुरू झालेली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा अविरत जोपासून यावर्षीही ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वाशिमतर्फे ६ डिसेंबरला स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ९ वाजता अभिवादन तसेच सायंकाळी ६ वाजता ‘कॅन्डल मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन व्हावे या दृष्टिकोनातून मोफत शिकवणी वर्ग घेण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. तसेच मालेगाव येथेदेखील ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता महामानवास अभिवादन म्हणून ‘कॅन्डल मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.