१३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 03:05 PM2019-12-06T15:05:55+5:302019-12-06T15:07:03+5:30

 ६ डिसेंबर रोजी देखील जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला. 

The tradition of 'Candle March' celebrated for 13 years! | १३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

१३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

Next
ठळक मुद्दे२००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ काढण्याला आंबेडकरी अनुयायांनी सुरूवात केली होती. महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते.सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत १३ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे.   ६ डिसेंबर रोजी देखील जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी वाशिम येथे साधारणत: २००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ काढण्याला आंबेडकरी अनुयायांनी सुरूवात केली होती. ६ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येतात. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते.
२००६ पासून सुरू झालेली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा अविरत जोपासून यावर्षीही ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन केले.
(प्रतिनिधी)

Web Title: The tradition of 'Candle March' celebrated for 13 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.