वाशिम ते लालबाग सायकलवारीची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:50 PM2019-09-02T15:50:06+5:302019-09-02T15:50:17+5:30
वाशिम येथून सायकलस्वार ग्रूप लालबागचा राजा मुंबईच्या दर्शनासाठी रवाना झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - गणेशोत्सव दरम्यान यावर्षीही वाशिम येथील सायकलस्वारांनी वाशिम ते लालबाग गणपती अशी सायकलवारी मोहिम हाती घेतली असून, १ सप्टेंबर रोजी वाशिम येथून सायकलस्वार ग्रूप लालबागचा राजा मुंबईच्या दर्शनासाठी रवाना झाला.
मोरया ब्लड डोनर ग्रूप व सायकल स्टुडीओच्या पुढाकारातून सलग चार वर्षापासून वाशिम ते लालबाग गणपती अशी सायकल मोहिम राबविली जात आहे. यावर्षीदेखील ही परंपरा कायम ठेवत १ सप्टेंबर रोजी सायकलस्वार वाशिम येथून लालबागकडे रवाना झाले. यावेळी शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. पोलीस विभागातील आर्यन डाखोरे व प्रशांत बक्षी यांनी सायकल मोहीमेला हिरवी झेंडी दाखविली. या अनोख्या मोहीमेव्दारे नियिमत रक्तदान करुन जीवनदान द्या, सायकल चालवा-निरोगी रहा, स्वच्छ भारत अभियान असा महत्वपुर्ण सामाजिक संदेश देण्याचा संकल्प सायकलस्वार नारायण व्यास, महेश धोंगडे, शाम खोले पाटील, नितीन पाढेण, गौतम वाठोरे आदी युवकांनी केला. ही सायकल मोहीम लालबागचा राजा मुंबईच्या दर्शनासाठी रवाना झाली.