गुरुमंदिर संस्थानची अन्नदानाची परंपरा कायम - प्रकाश घुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:05 PM2020-04-14T17:05:21+5:302020-04-14T17:05:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु कारोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थानच्यावतिने दररोज करण्यात येत असलेल्या शेकडो भाविकांना अन्नदान ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून भाविकांऐवजी गरजु ३०० लोकांना अन्नदान केल्या जात असल्याचे श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरुमंदिर) मंदिराचे विश्वस्त प्रकाश घुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या मुलाखतीदरमयान सांगितले.
कोराना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संस्थानचे योगदान?
कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर ३०० लोकांना दररोज अन्नदान केल्या जात आहे. संस्थानच्यावतिने शेकडो भाविकांसाठी अन्न शिजविल्या जात होते. परंतु संचारबंदी काळात मंदिरात गर्दी होऊनये याकरिता दर्शन बंद केल्याने भाविकांची गर्दी कमी झाली. दररोज बनविण्यात येत असलेले अन्न अविरत तयार करण्यात येत असून ते गरजुंना पाकीट तयार करुन जागेवर वाटप केल्या जात आहे.
शासनाच्या मदतीच्या आवाहनाबाबत काय सांगाल?
कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण देश संकटात आला आहे यात दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुमंदिर संस्थानच्यावतिने २१ लाख रुपयांची देणगी शासनाला देण्यात आली आहे.
भाविक दर्शनाकरिता मंदिरात येतात का?
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परिसरातील काही भाविक दर्शन मंदिरात प्रवेश न करतात बाहेरुन घेतांना दिसून येतात. परंतु प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिर केवळ गुरुंच्या पुजेपुरतेच सद्यस्थितीत आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
कोरानाच्या पृष्ठभूमिवर संस्थानच्यावतिने काय सांगाल?
देशात आलेले संकट पूर्णपणे नष्ट व्हावे याकरिता दररोज गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच हि परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संस्थान शासनाच्या सोबत राहून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.
भाविकांना काय मार्गदर्शन करणार?
देशात आलेले कोरोनाच्या संकटात कोणीही घराच्याबाहेर जाऊ नका, देवाची घरात पूजाअर्चा करा. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत. हे संकट टळल्यानंतर सर्व सुरुळीत होईल यात दुमत नसल्याने संकट टळेपर्यंत घरातच रहा.