शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 02:15 PM2019-04-14T14:15:11+5:302019-04-14T14:15:48+5:30

ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.

 Tradition of the Shiva-Parvati wedding ceremony for hundreds of years | शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

Next

- साहेबराव राठोड  
 

शेलुबाजार : कुठेही शिव मदिरामध्ये शिवाची किंवा पार्वतीची मुर्ती आढळून येत नाही. बहुतांश मंदिरात लिंग दिसून येते. परंतु वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर तालुकयात असलेल्या ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.
समाजामध्ये ज्या प्रमाणे लग्न लावल्या जातात त्याच प्रमाणे हा संपूर्ण सोहळा असतो. लग्नपत्रिकाऐवजी येथे कार्यक्रम पत्रिका प्रकाशित करुन त्यामध्ये लग्नसोहळयाची वेळ नमूद केल्या जाते. दरवर्षी बारसनिमित्त हा सोहळा पार पडतो. रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांच्या स्वागतापासून तर त्यांना अक्षदा देण्याचे कार्य गावकरी करतात. लग्न सोहळा आटोपल्यानंतर पंगता बसविण्यात येतात. यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात. या कार्यक्रमाचा विडा गावातील अनिल बळीराम राऊत, मनोहर ज्ञानदेव वानखडे, ओकांर शंकरराव राऊत, मोहन विठ्ठल्राव राऊत यांनी उचलला होता. विशेष म्हणजे या लग्नसोहळयाची तयारी एक महिन्यापूर्वीपासून सुरु होते. या तयारीसाठी श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा नागीचे सर्व विश्वस्त व भाविक प्रयत्नशिल असतात.
या कार्यक्रमानिमित्त भव्य यात्रा व महाप्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी ९ एप्रिल ते १३एप्रिलपर्यंत श्रीमद भागवत कथा घेण्यात आली. विविध नामांकित मान्यवरांची किर्तने यावेळी पार पडली. १४ ते १६ विविध किर्तनकारांची किर्तने व १६ एप्रिल रोजी शिवपार्वती पूजा , महाआरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित आहे.
या कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन ईचा नागी येथील शिव पार्वती मंदिर संस्थानच्यावतिने करण्यात आले आहे.


शेकडो वर्षापासून लागतेय लग्न
मंगरुळपीर तालुक्यातील ईचा नागी येथे शिव पार्वती विवाह सोहळयाची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची असल्याचे भाविक सांगतात. यात्रेत असलेले ९० वर्षिय भाविकांने सांगितले की, मी लहान असतांना सुध्दा या सोहळयासाठी येत होतो. नेमके ही परंपरा कधी सुरु झाली हे सांगता येत नसले तरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालु असल्याचे ९० वर्षिय भाविकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट होत आहे.

 

Web Title:  Tradition of the Shiva-Parvati wedding ceremony for hundreds of years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.