पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 04:23 PM2020-07-18T16:23:44+5:302020-07-18T22:58:56+5:30

पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे.

Traditional business ‘lockdown’; youth now run flour mill | पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी

पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी

Next

- प्रफुल बानगावकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने अनेक लघु व्यवसाय अडचणीत सापडले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कारंजातील अनेकांनी आपले पारंपारिक व्यवसाय बदलले आहेत. पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे.
कारंजा शहरात लघु व्यवसायिकांची संख्या दीड हजारावर आहे. तसेच हातगाडया व बाराबलुतेदार पध्दतीने व्यवसाय करणारे व्यवसायिकसुध्दा आजही आपला व्यवसाय नित्यनियमाने करतात. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी आहे. लॉकडाऊनचा फटका लघु व्यावसायिकांनादेखील बसला आहे.  कपडे प्रेस करणे, गुपचुपची गाडी, केशकर्तनालय, चहाटपरी, पानठेला, भेळ गाडी, ब्युटी पॉर्लर, हॉटेल व्यवयाय, वाहन चालक आदी काही लघुव्यसायीकांवर उपासमारीची वेळ आहे. लॉकडाऊनच्या या विपरित परिस्थितीत अनेकांनी हिम्मत न हारता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसºया व्यवसाय, धंद्याची निवड केली आहे. येथील हॉटेल व्यवसाय करणारे श्रीपाद रेवाळे यांनी आता डेली निड्स हा व्यवसाय सुरू केला. पानठेला संचालक हितेश डिके यांनी भाजीपाला विक्री हा पर्यायी व्यवसाय सुरू केला. कपडे प्रेस करणे, लग्नसराईत फेटे बांधण्याचा व्यवसाय करणारे गजानन आसरे यांनी पिठ गिरणीचा व्यवसाय निवडला आहे. पर्यायी व्यवसाय निवडून लघु व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे कारंजा शहरात दिसून येते.
 
इतरांसाठी प्रेरणादायी
लॉकडाऊनमुळे पारंपारिक व्यवसाय करणे अवघड असले तरी हताश न होता अनेकांनी पर्यायी व्यवसाय, धंदे निवडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला आहे. ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Web Title: Traditional business ‘lockdown’; youth now run flour mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.