फेरीवाल्यांमुळे वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:52+5:302021-01-20T04:39:52+5:30
-------------- नाल्यांची दुरवस्था; पालिकेचे दुर्लक्ष वाशिम : जुनी आययूडीपी कॉलनी परिसरातील काही ठिकाणच्या नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे ...
--------------
नाल्यांची दुरवस्था; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : जुनी आययूडीपी कॉलनी परिसरातील काही ठिकाणच्या नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे सांडपाणी जागीच थांबून दुर्गंधी सुटत आहे. वारंवार मागणी करूनही नगर परिषदेकडून नाल्यांची स्वच्छता केली जात नाही किंवा नव्याने नाल्यांचे बांधकाम करण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
---------------
गायीच्या दुग्धोत्पादनात वाढ
अनसिंग : भारतीय गोवंशामध्ये दूध उत्पादनाकरिता प्रसिद्ध असलेल्या गीर गायीच्या संगोपनासाठी वाशिम तालुक्यातील फाळेगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे गायीच्या दुग्धोत्पादनात गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली असून, दुधाला ६५ रुपये प्रतिलिटरचा दर मिळत आहे.
-------------
शेलुबाजार परिसरात मेंढ्यांचे कळप
शेलुबाजार : गुजरात, आंध्र प्रदेशातील मेंढपाळ महाराष्ट्रात आपल्या शेळ्या, मेंढ्या घेऊन येत आहेत. वाशिम जिल्ह्यातही हे मेंढपाळ दाखल झाले असून, साेमवारी शेलू शिवारात एक मेंढपाळ शेकडो शेळ्या, मेंढ्या चारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
--------------
कारपा मार्गावर दिशादर्शकाचा अभाव
मानाेरा : मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर माहिती फलक किंवा दिशादर्शक फलक न लावल्यामुळे या मार्गाने मानोरा किंवा शेंदूरजना आढावकडे जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण होऊन त्यांचा मार्ग चुकत असल्याने ते आसोला खु.कडे जात आहेत. त्यामुळे या मार्गावर संबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.
---------------
फिरत्या वाहनाने कोरोना जनजागृती
कामरगाव : कारंजा तालुक्यात काेराेना संसर्ग पाहता आरोग्य विभागाकडून गावागावांत आरोग्य विभाग, ग्रामपंचायतींच्या पुढाकारातून फिरत्या व्हॅनने कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कामरगाव येथे नुकतीच जनजागृती करण्यात आली.
--------------
बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी
मंगरुळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील चिंचोली आणि आसेगावदरम्यान वाहणाऱ्या भोपळपेंड नदीवर उभारलेल्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
॰------------