खड्डे बुजविल्याने वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:53+5:302021-02-27T04:54:53+5:30

रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी धनज बु.: धनज बु.-कारंजा या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आ. राजेंद्र पाटणी ...

The traffic was light at this time | खड्डे बुजविल्याने वाहतूक सुरळीत

खड्डे बुजविल्याने वाहतूक सुरळीत

Next

रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी

धनज बु.: धनज बु.-कारंजा या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आ. राजेंद्र पाटणी यांनी पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून ९ कोटी रुपये मंजूरही करून घेतले. परंतु, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सदर काम त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.

रामटेक मार्गावरील पूल अर्धवट

कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी ते रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. शिवाय या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.

तूरडाळ मिळत नसल्याची तक्रार

वाशिम : तूरडाळ बंद झाली असताना गत काही महिन्यांपासून रेशन दुकानातून तूरडाळ मिळत नसल्याने लाभार्थी रेशन दुकानदार, पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत आहेत.

Web Title: The traffic was light at this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.