शास्त्रीय पद्धतीने फळ पिकांच्या लागवडीबाबत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:44 AM2021-05-21T04:44:05+5:302021-05-21T04:44:05+5:30

या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश नागरे, ...

Training on cultivation of fruit crops in a scientific manner | शास्त्रीय पद्धतीने फळ पिकांच्या लागवडीबाबत प्रशिक्षण

शास्त्रीय पद्धतीने फळ पिकांच्या लागवडीबाबत प्रशिक्षण

Next

या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश नागरे, अधिष्टाता, उद्यानविद्या, डॉ. प.दे.कृ.व्ही, अकोला हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुविदे फाऊंडेशन चे ट्रस्टी संजय उकळकर व फळबाग तज्ञ, औरंगाबाद डॉ. बी. एम. कापसे, यांची उपस्थिती लाभली. तर तांत्रिक मार्गदर्शक म्हणून फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एम, भराड, सह्योगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉ. उज्वल राऊत, फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील, पीक संरक्षण तज्ञ राजेश डवरे वाशीम यांची उपस्थिती होती.

डॉ. प्रकाश नागरे यांनी शेतकर्यांनी कोणत्याही अमिशाला बळी न पडता जमीन, हवामान व बाजारपेठेचा अभ्यास करून फळ पिकाची निवड करावी असे आवाहन केले. डॉ. बी. एम. कापसे यांनी पारंपरिक फळ पिकांची आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड केल्यास अधिक आर्थिक नफा मिळवणे शक्य असल्याचे सांगितले व आंबा पेरू, सीताफळ इत्यादी पारंपारिक पिकांची घन आणि अति घन पद्धतीने लागवड करावी असे आवाहन केले. डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी फळ पिकाकडे वळून आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक स्थिती बळकट करावी असे आवाहन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास २०० शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन निवृत्ती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.

Web Title: Training on cultivation of fruit crops in a scientific manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.