वाडी रायताळ येथे प्रात्यक्षिकधारक शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:20+5:302021-07-16T04:28:20+5:30
या प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच सुधाकर मानवतकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी रिसोड यांचे प्रतिनिधी नरवाड, तर ...
या प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच सुधाकर मानवतकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी रिसोड यांचे प्रतिनिधी नरवाड, तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. तांत्रिक सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ तथा कडधान्य पीक प्रात्यक्षिक प्रभारी राजेश डवरे यांनी उडीद उत्पादन व पीक संरक्षण यासंदर्भात विस्तृत विवेचन केले. तसेच उडीद पीक प्रात्यक्षिकात शेतकऱ्यांच्या शेतावर दिल्या गेलेल्या पीडीके व्ही ब्लॅक या उडीद वाणाची वैशिष्ट्ये तसेच उडीद पिकावरील विविध किडी व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकरी बंधूंनी विचारलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे निराकरण केले. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी नरवाडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना यावर विस्तृत विवेचन केले. प्रशिक्षणासाठी वाडी रायताळ येथील समस्त शेतकरी बंधूंनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भगवान देशमुख कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांनी केले.
---------------
विविध किडी व नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
वाडी रायताळ येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना उडीद पिकावरील विविध किडी व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे निराकरण केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.