शाळेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:34 PM2018-10-31T13:34:42+5:302018-10-31T13:35:17+5:30
वाशिम : यशदा पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना तीन दिवशीय प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यशदा पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना तीन दिवशीय प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. २९ आॅक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या या प्रशिक्षणाचा समारोप ३१ आॅक्टोबर रोजी समारोप झाला.
उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा तायडे तर उदघाटक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे होते. यावेळी यशदा पुणे समन्वयक डॉ. डी.डी. नागरे, प्रशिक्षक भारत लादे, लेखाधिकारी प्रकाश वानखेडे आदींची उपस्थिती होती. शाळेत दैनंदिन कामकाज करताना चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना भेडसावणाºया विविध समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण करणे आणि आवश्यक त्या बाबींची माहिती देणे या दुहेरी उद्देशाने प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसाच्या कालावधीत सेवा मुल्ये, व्यसनमुक्ती, ताणतणाव मुक्त कामकाज, आरोग्य व आहार, आर्थिक प्रदाने, स्वच्छ भारत, कार्यालयीन कामकाज आदी विषयांवर आवश्यक ती माहिती देण्यात आली. कर्मचाºयांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. डॉ. प्रतिभा तायडे, टी.ए. नरळे, डॉ. डी.डी. नागरे, भारत लादे आदींनी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात वाशिम, रिसोड, मालेगाव या तीन तालुक्याचे ११० कर्मचारी हजर होते.