मिरची पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:33+5:302021-07-17T04:30:33+5:30

या प्रशिक्षणासाठी उद्घाटक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे यांची उपस्थिती लाभली, तर तज्ज्ञ मार्गदर्शक ...

Training on integrated management of chilli crop. | मिरची पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण.

मिरची पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण.

Next

या प्रशिक्षणासाठी उद्घाटक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे यांची उपस्थिती लाभली, तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षणात दिले जाणारे मिरची पिकाचे शिफारशीत पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अंगीकार करून प्रभावी पीक संरक्षणाकरिता व कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्याकरिता एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. राजेश डवरे यांनी मिरची पिकावरील फुलकिडे, मावा, कोळी, फळ पोखरणारी अळी व इतर प्रमुख किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार यावर प्रकाश टाकला तसेच मिरची पिकावरील रोप कोलमडणे, मर, शेंडे मर, भुरी, बोकड्या किंवा चुरडा मुरडा इत्यादी रोगाच्या संदर्भातील व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनही केले.

Web Title: Training on integrated management of chilli crop.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.