‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:06 AM2017-07-26T02:06:26+5:302017-07-26T02:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात मंगळवार, २५ जुलै रोजी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी सर्व सहायक निबंधक, महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक कटके पुढे म्हणाले की, शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांनी जिल्हा उपनिबंधक अथवा संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या कार्यालयात असलेला अर्जाचा विहित नमुना प्राप्त करून घ्यावा. हा अर्ज भरून तो आॅनलाइन करण्यासाठी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रांशी संपर्क साधावा. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी संबंधित शेतकºयाचे आधारकार्ड, बँकेचे बचत खाते, कर्जखात्याचे पासबुक, सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. आधारकार्ड असल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया होऊ शकणार नाही.
आधारकार्डशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी अथवा बायोमॅट्रिकच्या साहाय्याने संबंधित शेतकºयाची पडताळणी झाल्यानंतरच त्यांचा आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे आॅनलाइन अर्ज कसा भरावा, याबाबत मार्गदर्शन केले.