पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी २१ नोव्हेंबरला निवड चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:23 PM2017-11-15T13:23:41+5:302017-11-15T13:45:49+5:30
वाशिम: अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांची २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय वाशिम येथे निवड चाचणी होणार आहे.
वाशिम: अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांची २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय वाशिम येथे निवड चाचणी होणार आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवार हा अल्पसंख्याक प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी आणि जैन) असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थींचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. उमेदवार १८ ते २८ वयोगटातील असावा व इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची उंची - महिला १५५ सें.मी व पुरुष १६५ सें.मी. छाती- पुरुष- ७९ सें.मी. (फुगवुन ८४ सें.मी.) असणे आवश्यक आहे. उमेदवार शाररीकदृष्टा निरोगी व सक्षम असावा असे अपेक्षीत आहे. उमेदवाराने निवड चाचणीसाठी येताना अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, आधारकार्ड, सेवायोजन कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला यांची सत्यप्रत देणे आवश्यक राहिल. हे प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज ३ तासाचे प्रशिक्षण वर्ग व २ तासाचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांस दरमहा १५०० रुपये प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे. गणवेश साहित्यासाठी रुपये १००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात चहापान व अल्पोपहार सुध्दा देण्यात येणार आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या कालावधीत वाशिम जिल्हा मुख्यालयाचे पोलीस परेड ग्रांऊडवर विहित अर्ज आणि सर्व कागदपत्राच्या सत्यप्रतीसह निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.