क्रीडा शिक्षकांनाही आता प्रशिक्षण

By Admin | Published: December 18, 2014 01:10 AM2014-12-18T01:10:19+5:302014-12-18T01:10:19+5:30

मास्टर्स ट्रेनर शिबिर प्रस्तावित : ३५0 शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण.

Training for sports teachers is now | क्रीडा शिक्षकांनाही आता प्रशिक्षण

क्रीडा शिक्षकांनाही आता प्रशिक्षण

googlenewsNext

संतोष वानखडे/ वाशिम क्रीडा

संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्याबरोबरच क्रीडा शिक्षक ह्यहायटेकह्ण करण्यासाठी क्रीडा विभाग आता क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे. २८ एप्रिल २0१४ च्या शासन आदेशानुसार क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर शिबिरही घेण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी क्रीडा विभाग नवनवीन उपक्रम अमलात आण त आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांंना क्रीडाविषयक धडे देण्यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र क्रीडा शिक्षकांना मास्टर्स ट्रेनर शिबिर किंवा प्रशिक्षण दिले जात नसल्याने खेळांमधील आधुनिक तंत्रज्ञानापासून क्रीडा शिक्षक वंचित राहत होते. या पृष्ठभूमीवर क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २८ एप्रिल २0१४ रोजी जारी केले होते. या आदेशांची आता अंमलबजावणी सुरू झाली असून, राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी पात्र क्रीडा शिक्षकांची शोध मोहीम राज्यभरात राबविली जात आहे. खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, क्रीडा क्षेत्रात होणार्‍या बदलांची माहिती क्रीडा शिक्षकांना या प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हय़ातून १0 अशा एकूण ३५0 क्रीडा शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे.

Web Title: Training for sports teachers is now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.