ब्राह्मणवाडा येथे ट्रॅक्टर पेरणीवर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:41+5:302021-05-28T04:29:41+5:30

या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दोन ते तीन दिवसांत ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी करताना पेरणी यंत्रांचे ...

Training on tractor sowing at Brahmanwada | ब्राह्मणवाडा येथे ट्रॅक्टर पेरणीवर प्रशिक्षण

ब्राह्मणवाडा येथे ट्रॅक्टर पेरणीवर प्रशिक्षण

Next

या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दोन ते तीन दिवसांत ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी करताना पेरणी यंत्रांचे वरील फंनास बियाणाची नळी लावावी व खालील फंनास खताची नळी लावावी, बियाणे ३ ते ५ सें.मी.खोलीवरच टाकावे व खत बियाणाच्या खाली ५ से.मी. पडेल हे पहावे व एक एकर पेरणीसाठी ४५ ते ५२ मिनीट लागतील याप्रमाणे ट्रॅक्टर सेकंड लो गियरमध्ये चालवावे. तसेच रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. ज्या भागात ७५० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी साध्या पेरणी यंत्राने पेरणी करताना प्रत्येक सात तासांनंतर ६० सें.मी. रुंदीची खोल मृत सरी पाडावी तसेच सोयाबीनची उत्पादकता वाढी संदर्भात यशस्वी पेरणीची अष्ट सूत्री कृषी सहायक आर. यू. किसवे यांनी ब्राह्मणवाडा येथील ट्रॅक्टरचालक-मालक शेतकऱ्यांना समजावून सांगितली.

-------------------

Web Title: Training on tractor sowing at Brahmanwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.