दोन दिवसांत वाशिम जिल्हा परिषदेच्या ४५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:13 AM2021-07-28T11:13:08+5:302021-07-28T11:13:18+5:30
Transfer of Washim Zilla Parishad employees : दोन दिवसांत जवळपास ४५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली विविध विभागांची प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत २६ जुलैपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन दिवसांत जवळपास ४५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ३० जूनपर्यंत विविध शासकीय विभागांमधील बदली प्रक्रियेस स्थगिती दिली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वषार्तील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सर्व बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेत २६ जुलैपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी शिक्षण, जलसंधारण, सामान्य प्रशासन व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.
(प्रतिनिधी)