शिरपूर जैन येथील दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:43+5:302021-08-20T04:47:43+5:30

शिरपूर जैन पोलीस स्टेशनचा हद्दीतमध्ये ५९ गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या शिरपूर पोलीस स्टेशनची हद्द फार मोठी आहे. गोवर्धना आऊट ...

Transfer of ten police personnel from Shirpur Jain | शिरपूर जैन येथील दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

शिरपूर जैन येथील दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

शिरपूर जैन पोलीस स्टेशनचा हद्दीतमध्ये ५९ गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या शिरपूर पोलीस स्टेशनची हद्द फार मोठी आहे. गोवर्धना आऊट पोस्ट, केनवड, खंडाळा, करंजी,चांडस व शिरपूर टाऊन अशा सहा बीट पोलीस स्टेशन अंतर्गत आहे. त्यातच समृद्धी महामार्ग, नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्ग, रिसोड वाशिम व मालेगाव रिसोड महामार्ग हा शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातो. ५९ गावांचा लाखो लोकसंख्येच्या जीवनाची सुरक्षा करण्याचे काम पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पूर्वी अगोदर शिरपूर पोलीस स्टेशनला गाव लोकसंख्येचा विचार करता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती. आता तर यामध्ये नव्याने प्रशासकीय बदल्यामुळे अधिक भर पडली आहे. शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत २८ पोलीस कर्मचारी, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक असे अधिकारी तैनात होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या बदल्यांत यापैकी दहा कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली. दोन पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. बदली सेवानिवृत्तीमुळे १३ ने कमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा संख्येत पोलीस प्रशासनाने केवळ नवीन तीन जणांना शिरपूर येथे तैनात दिली. म्हणजेच १३ ऐवजी केवळ तीन कर्मचारी नव्याने शिरपूर येथे देण्यात आलेत. त्यातच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक यांच्या पथकामध्ये चार पोलीस कर्मचारी, तर खासदार भावना गवळी यांच्या सुरक्षेसाठी येथील एक कर्मचारी तैनात आहे.

-------------

बॉक्स.... शिरपूर पोलीस स्टेशनची हद्द दोन तालुक्यात

शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालेगावसह रिसोड तालुक्यातील ही बरीच गावे येतात. त्यामुळे या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यात न्यायालयात पेशीसाठी मालेगाव आणि रिसोड न्यायालयात प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी अगोदरच निमित्त कार्यरत ठेवावा लागतो. शिवाय जिल्हा सत्र न्यायालयातील प्रकरणासाठी वाशिम येथेही एक पोलीस कर्मचारी नियमित हजर ठेवावा लागतो.

Web Title: Transfer of ten police personnel from Shirpur Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.