महसूल विभागातील ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:43+5:302021-08-13T04:46:43+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार १४ ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सर्व बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. २६ ते २८ जुलैदरम्यान जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह विविध विभागांतील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविल्याने कर्मचाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. जवळपास ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक, मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय एकतर्फी किंवा परस्पर आपापसात संलग्न करण्यात येऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
०००००
अनेकांना तालुक्याच्या ठिकाणी पाठविले
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या काही कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी तहसील व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील काहींची बदली आता तालुक्याच्या ठिकाणी झाली असून, तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत काही कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बदली देण्यात आली आहे. त्यामुळे काहींची सोय तर काहींची गैरसोय झाली आहे.
०००००
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या
जिल्हांतर्गत बदली
अव्वल कारकून १२
कनिष्ठ लिपिक २१
मंडळ अधिकारी ०९
.......
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत बदली
अव्वल कारकून १७
कनिष्ठ लिपिक १६