...अखेर पांगरखेडा शिवारात बसविले रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:18 PM2018-12-15T13:18:56+5:302018-12-15T13:19:07+5:30

लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी येथे रोहित्र बसविण्यात आले. 

Transformer has been installed in Pangarkheda field | ...अखेर पांगरखेडा शिवारात बसविले रोहित्र

...अखेर पांगरखेडा शिवारात बसविले रोहित्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): पांगरखेडा येथील रोहित्र मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्याने पांगरखेडासह परिसरातील शेतकºयांना सिंचन करणे कठीण झाले होते. पर्यायी रोहित्रासाठी खांब उभारूनही त्यावर रोहित्र बसविण्याची तसदी घेण्यात येत नव्हती. या संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी येथे रोहित्र बसविण्यात आले. 
मालेगाव तालुक्यात नव्यानेच मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पांगरखेडा परिसरातील शेतकºयांची मोठ्या प्रमाणात जमिन अधिग्रहित करण्यात आली आणि ती बुडित क्षेत्रात गेली. याच परिसरात शेतकºयांना सिंचन सुविधेसाठी वीज पुरवठ्याच्या उद्देशाने उभारलेले रोहित्रही बुडित क्षेत्रात गेले. त्यामुळे पर्याय म्हणून दुसरे रोहित्र इतर ठिकाणी मंजूर झाले आणि त्यासाठी वीजखांबांची उभारणीही करण्यात आली. तथापि, गेल्या चार महिन्यांपासून या खांबावर नवे रोहित्रच बसविण्यात आले नाही. त्यामुळे पूर्वीच्या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना सिंचन करणे अवघड झाले आणि रब्बी हंगामातील पिके संकटात आली होती. लोकमतने या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकºयांच्या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधले. अखेर शनिवार १५ डिसेंबर रोजी पांगरखेडा शिवारात पर्यायी रोहित्र बसविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामाती गहू, हरभºयासह भाजीपाला पिकांना पाणी देणे शक्य होणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

नियमित वीज पुरवठा देण्याची मागणी 
पांगरखेडा परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली असून, आता नव्यानेच तयार झालेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या आधारे शेतकरी भाजीपाला पिकेही घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक शेतकºयांनी भाजीपाला पिकांची लागवडही केली आहे. या पिकांला पाण्याची मोठी गरज असते. त्यामुळे महावितरणने नव्या रोहित्रावरून शेतकºयांना पुरेसा आणि नियमित वीज पुरवठाही सुरू ठेवावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

 

पांगरखेडा येथील रोहित्र मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्याने मागील तीन महिन्यांपासून सिंचन करणे कठीण झाले होते. आता या ठिकाणी पर्यायी रोहित्र मिळाल्याने सिंचनाची अडचण दूर होणार आहे. 
- भगवान शिंदे
शेतकरी पांगरखेडा (मालेगाव)

Web Title: Transformer has been installed in Pangarkheda field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.