जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 03:45 PM2018-09-30T15:45:56+5:302018-09-30T15:47:35+5:30

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे.

Transport of animals by cruelty in washim | जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

Next
ठळक मुद्देपशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. मात्र, कायदा होऊन ५८ वर्षे होऊनही आजही जनावरांची चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उजागर झाला.
प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये पशूंची वाहतूक करताना पशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. पशूंच्या वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. पशूंची वाहतूक करताना वाहनात पशूंच्या उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. पशूंना वाहनात चढविणे आणि उतरविण्यासाठी योग्य आकाराच्या फलाटांची सोय असावी, पशूंना वाहतुकीदरम्यान बसण्यासाठी किमान ५ सेंटीमीटर मऊ गवताचे तळ असायला हवे, पशूंची वाहतूक करणारे वाहन पुरेसे तथा मोठ्या आकाराचे असावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; परंतु यातील एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.
 
विनापरवाना चालते जनावरांची वाहतूक!
वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ९६ अन्वये पशूधनाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधित जनावर सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयांचे स्वास्थ तपाासणी प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पशूंची वाहतूक करताना नियमानुसार तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून विहित परवाना घेणेही बंधनकारक आहे. मात्र, वाशिममधील गुरांच्या बाजारातून होणाºया जनावरांच्या वाहतूकीदरम्यान बहुतांश वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे संबंधित त्या-त्या यंत्रणांनी लक्ष पुरविणे आवश्यक ठरत आहे.
 
प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा १९६० मधील तरतुदीनुसारच जनावरांची वाहतूक व्हायला हवी. यासंदर्भात तपासणी मोहिम राबवून चुकीच्या पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाºयांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल.
- जयश्री दुतोंडे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

Web Title: Transport of animals by cruelty in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.