चाेरटया मार्गाने रेतीची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:34+5:302021-02-06T05:18:34+5:30
रेती चोरटे हे शेतकऱ्यांच्या शेतातून आपल्या ट्रॅक्टरचे वाहने नेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची अवस्थासुद्धा खराब करून टाकत आहेत, ...
रेती चोरटे हे शेतकऱ्यांच्या शेतातून आपल्या ट्रॅक्टरचे वाहने नेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची अवस्थासुद्धा खराब करून टाकत आहेत, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतातून जावे लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. वाकद गावात पाच ते सहा रेती चोरटे हे रोज आपल्या ट्रॅक्टरद्वारे रेती आणून त्याची अवैध विक्री करत आहेत. यातील काही रेती चोरटे हे गावातील शेतकऱ्यांसोबत वादसुद्धा करीत आहेत , परंतु महसूल प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांना यांनी आपल्या हाताशी धरून हे अवैध रेती तस्करी करीत असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागाने रेती चोरट्यांचे ट्रॅक्टर जप्त करून त्यांच्यावर फौजदारीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाकद येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
...........................
अवैध रेती घेऊन जाणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टरवर लक्ष ठेवण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथक राेज रात्री रेती घाटावर जाऊन पाहणी करणार आहे.
- आर. पी. देशपांडे
मंडळ अधिकारी, वाकद सर्कल