ट्रॅव्हल्समधील प्रवासी बालंबाल बचावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:25 PM2017-09-08T20:25:42+5:302017-09-08T20:25:54+5:30
ब्रेक ‘फेल’ झाल्याने पुणे-दिग्रस दरम्यान धावणारी राजकोट ट्रॅव्हल्स ही मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडप टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला खाली घसरल्याची घटना ८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - ब्रेक ‘फेल’ झाल्याने पुणे-दिग्रस दरम्यान धावणारी राजकोट ट्रॅव्हल्स ही मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडप टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला खाली घसरल्याची घटना ८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स जात असल्याचे पाहून काही जणांनी उडी मारल्याने एकूण चार जण किरकोळ जखमी झाले. पुणे येथून येणारी ही बस शुक्रवारी मालेगावमार्गे दिग्रसकडे जात होती. वडप टोलनाक्याजवळ अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली घसरली. प्रसंगावधान राखून चालकाने तातडीने ट्रॅव्हल्सवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे ट्रॅव्हल्समधील जवळपास ४० प्रवासी सुखरूप आहेत. काही जणांनी घाबरून ट्रॅव्हल्समधून खाली उडी मारली. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले.