जखमी काळविटावर उपचार करुन केले वनविभागास सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:03 PM2018-06-01T14:03:02+5:302018-06-01T14:03:02+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील मोझरी शिवारात जखमी अवस्थेत शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या काळविटाच्या पाडसावर जखमी अवस्थेत मदत करुन त्यावर उपचार करुन संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन मांढरे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.
मंगरुळपीर : तालुक्यातील मोझरी शिवारात जखमी अवस्थेत शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या काळविटाच्या पाडसावर जखमी अवस्थेत मदत करुन त्यावर उपचार करुन संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन मांढरे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.
मोझरी गावाशिवारातील शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून काळविट जखमी अवस्थेत पडलेले होते.पाण्यामुळे व्याकुळ होवुन पडलेल्या या पिलात चालण्याचे बळ सुध्दा राहिले नव्हते. त्यामुळे ते निपचित अवस्थेत पडलेले होते. अंगी कोणतेच बळ न उरल्यामुळे भटकत्या कुत्र्यांनी या पिलाला चावे घेवुन जखमी सुध्दा केलेले होते. शिवाजी परांडे यांच्या ही बाब निदर्शनास येताच , त्यांनी संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन उर्फ बाळा मांढरे यांना मोबाइलवरुन या घटनेची माहिती दिली.सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक्ष सचिन मांढरे यांनी त्यांचे कार्यकर्ते अमोल गादेकर यांच्यासह घटनास्थळावर धाव घेवुन शिवाजी परांडे व अमोल गादेकर यांच्या मदतीने सदर पिलास मंगरुळपीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डॉक्टरांनी काळविटच्या सदर पिलावर उपचार करुन त्यास जीवनदान दिले. जखमांवर योग्य उपचार करुन औषधोपचार केल्यामुळे सदर पिलाच्या अंगात बळ येवुन ते सामान्य हालचालीस योग्य झाले. या घटनेची माहिती वनअधिकारी अविनाश वानखडे याना सुध्दा देण्यात आली. वनअधिकारी अविनाश वानखडे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात सदर पिलास सोपविले. यावेळी निरज रघवंशी, सुनिल भुतडा, शेषराव तेलंग, गोटु ठाकुर, तुषार किरसान, यश मानेकर, प्रतिक मानेकर, शुभम भुतडा, शिल्पा मांढरे, नंदनी मांढरे, कल्याणी जगदाळे, मनोज काटकर व शिवरत्न मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.