रस्त्यानजिकचे वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:48 PM2018-05-05T16:48:06+5:302018-05-05T16:50:23+5:30
सामाजिक वनिकरण विभागाकडून लावण्यात आलेले अनेक वृक्ष करपून नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचे दिसून येत आहे.
वाशिम : जिल्ह्याचे तापमान सद्या ४३ अंश सेल्सियसच्या आसपास पोहचले असून पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या दुहेरी संकटामुळे रस्त्यानजिक सामाजिक वनिकरण विभागाकडून लावण्यात आलेले अनेक वृक्ष करपून नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचे दिसून येत आहे.
वाशिम ते शेलूबाजार मार्गावर सामाजिक वनिकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून सद्या या वृक्षांची उंची १० ते १२ फूट झालेली आहे. असे असताना यंदा जमिनीतील पाणीपातळी खालावण्यासोबतच जलस्त्रोतांची पाणीपातळी आटल्यने वृक्षांना पाणी देण्याची बाब अशक्य ठरत आहे. अशातच उन्हाचा पारा देखील दिवसागणिक वाढतच चालल्याने एका रांगेत लावण्यात आलेले अनेक वृक्षांची पाने करपून गेली आहेत. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास हे वृक्ष नामशेष होतील, अशी भिती वर्तविण्यात येत आहे.