रस्ते निर्मिती कामात मोठमोठ्या वृक्षांची कत्तल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 06:14 PM2018-11-12T18:14:06+5:302018-11-12T18:14:38+5:30
शेलुबाजार (वाशिम) : सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी रस्ते नुतनीकरणाची कामे जोरासोरात सुरू असून याआड येणाºया मोठमोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याचे दिसून येत आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी रस्ते नुतनीकरणाची कामे जोरासोरात सुरू असून याआड येणाºया मोठमोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातुलनेत मात्र वृक्षलागवडीचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
आर्णी ते अकोला या रस्त्याचे काम सुरू आहे. यादरम्यान असलेली मोठमोठी निंबाची झाडे तोडली जात आहेत. यामुळे कधीकाळी दाट सावली देणारा हा रस्ता आता मात्र बोडखा झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाने कल्पकता वापरून काही मोठ्या झाडांचा बचाव करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.