वाशिम : वृक्षलागवडीतील वृक्ष सुकली, शासनाचं दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:40 PM2018-02-13T12:40:27+5:302018-02-13T12:43:03+5:30
शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली
मंगरुळपीर (वाशिम) - शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली, तथापी जिल्ह्यात गत पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. यातच या वृक्षसंवर्धनासाठी योग्य प्रयत्न झाले नाही, त्यामुळे बहुतांश रोपे सुकली आहेत.
राज्य शासनाने जुलै २०१७ ते जुलै २०१९ या कालावधीत राज्यभरात ५० कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. या अंतर्गत जुलैमध्ये वृक्षाची लागवड करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यात सामाजिक संघटना, शासकीय, निमशासकीय संस्थानी पाच लाखांहून वृक्षाची लागवड केली. या वृक्षाचे संवर्धन करणे गरजेचे होते. परंतु गतवर्षी जिल्हात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाउस झाला, त्यामुळे शासनाची वृक्ष लागवड अडचणीत सापडली. त्यातच विविध संस्थांनी योग्य ती काळजी न घेतल्याने बहुतांश रोपे हिवाळ्यातच सुकली आहे. यामुळे शासनाचा उद्देश अपूर्णच राहिल्याचे दिसत असून यंदा दुसऱ्या टप्प्यात राज्यात होणारी १३ कोटीची वृक्षलागवडही यशस्वी होईल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.