राष्ट्रीय सेवा योजनेकडून वृक्षारोपण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:52+5:302021-08-12T04:46:52+5:30

उपवनसंरक्षक सुमंत सोळंके तसेच कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे यांच्या ...

Tree Planting Program from National Service Scheme | राष्ट्रीय सेवा योजनेकडून वृक्षारोपण कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजनेकडून वृक्षारोपण कार्यक्रम

Next

उपवनसंरक्षक सुमंत सोळंके तसेच कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनोजा येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून श्रमदानातून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बापूराव डोंगरे, वाशिम पोलीस दलात काॅन्स्टेबल, आधुनिक सावित्री, भटक्या गरीब मुलांना ज्ञानदानाचे अतुल्य कार्य करणाऱ्या संगीता ढोले, प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे वनरक्षक जामकर, काटेपूर्णा अभयारण्याचे वनरक्षक घोडके, वनरक्षक अहिरे, वनरक्षक दिघोडे तसेच प्रा. डाॅ. गजानन घोंगटे, प्रा. चेतन महल्ले, प्रा. तृषाल राऊत, वनमजूर डाखोरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षांचे रोपण करण्यात आले. चिंच, बेल, पापडा, बिब्बा, चिंच, बदामच्या शेकडो वृक्षांचे रोपण करून श्रमदानातून त्याचे ३ वर्षे संवर्धनाचा संकल्प रासेयोच्या स्वयंसेवकांनी केला. उजाड माळरानावर, वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनातून नंदनवन फुलविण्याचा मानस यावेळी स्वयंसेवकांनी मांडला. या उपक्रमाचे वनाधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद यांनी कौतुक केले.

Web Title: Tree Planting Program from National Service Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.