वृक्षलागवड काळाची गरज !

By admin | Published: July 2, 2016 12:04 AM2016-07-02T00:04:48+5:302016-07-02T00:04:48+5:30

महसूल राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन: श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कार्यक्रम, पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा आढावा.

Tree planting time needed! | वृक्षलागवड काळाची गरज !

वृक्षलागवड काळाची गरज !

Next

मानोरा (जि. वाशिम): वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पोहरादेवी (ता. मानोरा) येथील वन पर्यटन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, जगदंबा देवस्थानचे रामराव महाराज, भक्तीधाम ट्रस्टचे जितेंद्र महाराज, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, मानोराचे तहसीलदार ए. पी. पाटील सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, गवई आदी उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून यासाठी राज्य शासनाने २ कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावर्षी रामनवमी आणि सेवालाल जन्मोत्सवादरम्यान पोहरादेवी येथे भरलेल्या यात्रेदरम्यान महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, तसेच वाशिम-यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. याच वनपर्यटन केंद्रात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषीदीन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. याच दिवसाच्या औचित्यावर राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यावेळी ना. राठोड यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला.

Web Title: Tree planting time needed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.