धरणांच्या भिंतीवर उगवली झाडे, कॅनॉल्सही नादुरूस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:44 PM2018-04-11T15:44:20+5:302018-04-11T15:44:20+5:30

वाशिम : लघुपाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत सिंचन व्यवस्थापन विभागातील शाखा अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामांवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे.

Trees grown on the walls of the dam | धरणांच्या भिंतीवर उगवली झाडे, कॅनॉल्सही नादुरूस्त!

धरणांच्या भिंतीवर उगवली झाडे, कॅनॉल्सही नादुरूस्त!

Next
ठळक मुद्दे एकबुर्जी, सोनल आणि अडाण हे तीन मध्यम प्रकल्प असून १२३ लघु प्रकल्प कार्यान्वित आहेत. प्रकल्पांच्या भिंतींवर वाढलेली झाडे तोडून टाकणे, कॅनॉल्सची दुरूस्ती करणे यासह इतर कामे हाती घेऊन पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणे सहजशक्य आहे. भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे अनेक धरणांची सुरक्षितता धोक्यात आली.


वाशिम : लघुपाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत सिंचन व्यवस्थापन विभागातील शाखा अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामांवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या भिंतीवर उगवलेली मोठी झाडे तोडणे, नादुरूस्त झालेल्या कॅनॉलची दुरूस्ती यासह सिंचन व्यवस्थापनाची इतरही अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. 
जिल्ह्यात आजपर्यंत एकही मोठा सिंचन प्रकल्प उभा राहू शकला नाही. एकबुर्जी, सोनल आणि अडाण हे तीन मध्यम प्रकल्प असून १२३ लघु प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यापैकी सुमारे ८० प्रकल्प आजमितीस कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सुकलेल्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खोली वाढविणे, प्रकल्पांच्या भिंतींवर वाढलेली झाडे तोडून टाकणे, कॅनॉल्सची दुरूस्ती करणे यासह इतर कामे हाती घेऊन पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणे सहजशक्य आहे. मात्र, याकामी जलसंपदा विभागाने कुठलीच हालचाल केलेली नाही. तथापि, भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे अनेक धरणांची सुरक्षितता धोक्यात आली असून याकडे लक्ष पुरविण्याची मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. 
जुन्या प्रकल्प परिसरातील कॅनॉल्सच्या दुरूस्तीची काही कामे हाती घेण्यात आली आहेत. नव्याने उभारल्या जाणाºया प्रकल्पांना मात्र कॅनॉल्सऐवजी थेट पाईपलाईनचाच पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय प्रकल्पांच्या भिंतींवर उगवलेली झाडे तोडण्याची कामेही प्रथम प्राधान्याने हाती घेवून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. 
- प्रमोद मांदळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

Web Title: Trees grown on the walls of the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.